जळगाव / नगर सहयाद्री- रुग्णालयात दाखल पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या पत्नीला काही अंतरावरच मृत्यूने गाठले. गावातून बाहेर पडताच पायी चा...
जळगाव / नगर सहयाद्री-
रुग्णालयात दाखल पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या पत्नीला काही अंतरावरच मृत्यूने गाठले. गावातून बाहेर पडताच पायी चालत असलेल्या महिलेला रुग्णवाहिकेने धडक दिली, यात तिचा जागीच मृत्यू झाला.कुसुंबा (ता. जळगाव) येथील संगीता कैलास पाटील (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.
संगीता पाटील या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह कुसुंबा येथे वास्तव्यास होत्या. पती ची प्रकृती चांगली नसल्याने त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पत्नी आज सकाळी साडेआठच्या सुमारास सासू सोबत पतीचा जेवणाचा डबा घेवून घरून निघाल्या.घरातून बाहेर पडल्या अन् गावातून येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांना जोरदार धडक दिली. यात पत्नी च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीताबाई यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS