औरंगाबाद / नगर सह्याद्रि- औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या बायपासचे रुंदीकरण आणि सर...
औरंगाबाद / नगर सह्याद्रि-
औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या बायपासचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी केली होती. मात्र सर्व्हिस रोडऐवजी प्रशासनाने बीड बायपासच्या तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केले होते.
संपूर्ण उड्डाण पुलाचे काम होत आल्यावर ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अभियंताला उड्डाण पुलाची उंची कमी झाल्याचं लक्षात आले, आता ही चूक सुधारण्यासाठी त्यांनी जी शक्कल लढवली आहे ती वाचून तुम्ही देखील डोक्याला हात मारून घ्याल.
आपली चूक लक्षात येताच ठेकदार आणि अभियंता यांनी पुलाखाली सुमारे सात फूट खड्डा खोदला. त्यामुळे उड्डाणपूल पूर्णपणे खचला असून, पावसाळ्यात येथे पाणी जमा होणार आहे.या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. रात्री अपरात्री वाहन चालवताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने बऱ्याचदा अपघात देखील घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
COMMENTS