मुंबई । नगर सह्याद्री - आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अश...
मुंबई । नगर सह्याद्री -
आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचे दाखवले होते. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, सुप्रिया सुळे यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसत आहे. मी ताईंना पूर्ण यादी वाचून दाखवेन. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारे सरकार हे उद्धव ठाकरेंचे, शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचे सरकार होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रजासत्ताक दिनी बोलताना भाजपवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचे राजकारण कधी केले नाही. जो विरोधात असेल त्याच्यामागे ईडी सरकार आणि पक्षात प्रवेश केला की 100 खून माफ अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंना विरोध करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयाला विरोध करणे असे आहे.
COMMENTS