पुणे / नगर सहयाद्री- ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारा...
पुणे / नगर सहयाद्री-
ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, मला जे मानपत्र दिलं जातंय ते राज ठाकरे यांच्या हस्ते दिलं जातंय. माझा आवडता माणूस. राजकारणात ब्रिलियंट माणूस असणं फार अभावानं आढळतो. राज ठाकरे यांच्याकडं ब्रिलियंट माणूस म्हणून बघतो. असे लोकं फार कमी असतात. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रेम असणारा हा उत्कृष्ट कलावंत आहे.
आर्ट, कला आणि मराठी कलावंतांसाठी काम करणारा एक नेता म्हणून मी राज ठाकरे यांच्याकडं बघतो. मी ज्याच्याकडं आदरानं बघतो त्या माणसाकडून माझा सत्कार होतोय. थोर माणसाकडून सत्कार करणं, तीन दिवस कार्यक्रम करणं हे माझ्यासाठी सुखावह आहे. जास्तीत जास्त मजा कशी येईल, याचा विचार केला, असंही अशोक सराफ म्हणाले.
समारंभ हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. बरेच सत्कार मिळविलेत. पण, कुणाच्या हातून मिळविलेत तो महत्त्वाचा आहे. ५० वर्षे मी काम केलं. तुम्ही काय करता, हेसुद्धा टक लावून बघणारा हा दामले आहे, अशी मिश्किल्ली त्यांनी प्रशांत दामले यांना केली.
COMMENTS