मुंबई- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनयापासून दूर असली तरी तिच्याबद्दल चर्चा रंगतात. सध्या ऐश्वर्या चर्चेत आली आहे ती म्हणजे 2006 साल...
मुंबई-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनयापासून दूर असली तरी तिच्याबद्दल चर्चा रंगतात. सध्या ऐश्वर्या चर्चेत आली आहे ती म्हणजे 2006 साली प्रदर्शित झालेल्या ’धूम 2’ चित्रपटामुळे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशनने स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील दोघांचा लुक्स, डान्स, रोमान्समुळे चित्रपट चर्चेत होता. ऐश्वर्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनशी संबंधित आहे.
या चित्रपटात ऐश्वर्याचा पती अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. या तिघांशिवाय उदय चोप्रा आणि बिपाशा बसू यांचाही अभिनय पाहायला मिळाला. ऐश्वर्याने स्वतः एकदा फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की ती ऑनस्क्रीन किसिंगला सहमत नाही. ती किसिंग सीन करताना अजिबात कम्फर्टेबल नव्हती. किसिंग सीनला मान्यता न दिल्यामुळे तिने अनेक हॉलिवूड चित्रपट सोडले.
पण हिंदी चित्रपटसृष्टीत आधी प्रयत्न करण्याचा विचार तिने केला आणि त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घ्यायचं होतं. तिने आपल्या मुलाखतीत कबूल केलं आहे की, तिने चित्रपटात तो सीन केला होता ज्यामुळे तिला देशातील अनेकांनी कायदेशीर नोटीस पाठवल्या होत्या. कायदेशीर नोटीसमध्ये तिने असं का केलं, असं लेखी स्वरुपात तिला विचारलंही होतं. ’तू प्रतिष्ठित आहेस, तू आमच्या मुलींसाठी एक उदाहरण आहेस, तू दिलेला सीन आम्हाला पटतच नाही, तु हे का केलंस?
COMMENTS