मुंबई / नगर सहयाद्री- स्वयंघोषित संत आसाराम बापूला गांधीनगर कोर्टाने मोठा धक्का दिला असून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे. काल कोर...
मुंबई / नगर सहयाद्री-
स्वयंघोषित संत आसाराम बापूला गांधीनगर कोर्टाने मोठा धक्का दिला असून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे. काल कोर्टाने आसाराम बापूंना या संबंधात दोषी असल्याचे घोषित केले होते. ज्यानंतर आज हा निकाल दिला आहे.
एका वृत्तसंस्थाच्या महितीनुसार, आसाराम बापूवर 2013 मध्ये अहमदाबादमधील मोटेराच्या एका शिष्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तर नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत.
शिष्येवरील बलात्काराचे हे प्रकरण २२ वर्षे जुने आहे. 2001 मध्ये सूरतस्थित आश्रमात एका शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. आसारामची शिष्य असलेल्या पीडितेने एकूण सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता.
काल या प्रकरणातील इतर सहा आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. याच प्रकरणात आता गांधीनगर कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे. यावेळी आसाराम बापूला न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादर केले होते.
COMMENTS