मुंबई : उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी मंत्री अनिल परब यांची दापोलीतील (जि. रत्नागिरी) साई रिसॉर्ट व ४२ गुंठे जमीन अशी १०.२० कोटींची संप...
सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून परब यांनी हे रिसॉर्ट बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावरून आधी पर्यावरण विभागाने व नंतर ईडीने परब यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. सत्तांतराचे नाट्य सुरू असताना २१ ते २३ जूनदरम्यान परब यांची ईडीने चौकशीही केली होती. त्यानंतर ६ महिन्यांनी ईडीने जप्ती आणली. लवकरच परबांना अटक होण्याचे संकेत सोमय्यांनी दिले आहेत.
परब यांनी २०१७ मध्ये दापोलीत १ कोटीत १ जमीन खरेदी केली. तिथे २५ कोटींतून रिसॉर्ट उभारले. २०२० मध्ये केबल उद्योजक सदानंद परबला ही जागा १.१० कोटी रुपयांत विकल्याचे दाखवले. यात मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ईडीला संशय आहे. मात्र परब यांनी आरोप फेटाळले. त्यांच्या निवडणूक शपथपत्रातही या संपत्तीचा उल्लेख नाही. मंत्री असतानाही परब यांच्या खासगी व शासकीय बंगल्यांवर ईडीने छापे टाकले होते. तब्बल १२ तास पथक ठाण मांडून होते. त्याच वेळी परब यांना अटक होणार असल्याची शयता वर्तवली जात होती.
‘साई रिसॉर्टशी माझा संबंध नसल्याचे मी पूर्वीपासून सांगतोय. ईडीने जप्त केलेली संपत्ती सदानंद परब यांची आहे. माझी बदनामी केली जात आहे. आता मी कोर्टात जाऊन न्यायाची मागणी करेन,’ असे अनिल परब यांनी म्हटले आहे. ‘अखेर अनिल परब यांचा हिशेब होत आहे. आता तर ईडीने कारवाई सुरू केली आहे. परब यांची साई रिसॉर्टची संपत्ती जप्त होत आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
COMMENTS