पारनेर | नगर सह्याद्री- डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी फक्त दिनदलित वंचित समाजाचा उत्कर्ष करण्यासाठीं समाजहिताचे कार्य केले नाही तर देशातील बहुजन स...
पारनेर | नगर सह्याद्री-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी फक्त दिनदलित वंचित समाजाचा उत्कर्ष करण्यासाठीं समाजहिताचे कार्य केले नाही तर देशातील बहुजन समाजातील अठरापगड जातींना समान नागरी हक्क, अधिकार देण्यासाठी संविधानात लोकहितकारक कायदे केले. देशातील बहुजन वंचित पीडित समाज एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्याला समाज परिवर्तनाचा आदर्श देणारा पारनेर तालुका आहे. संविधान मेळाव्याच्या माध्यमातून आदर्शवत ठरणारा असा पारनेर तालुका आहे. देशात राजकारण वेगळ्या दिशेने जाताना दिसते आहे.जाती धर्माच्या नावाखाली राजकारणी स्वतची पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे समाजात दुही माजत आहे, असे प्रतिपादन आनंदराज आंबेडकर यांनी केले. या प्रसंगी अॅड. संघराज रूपवते व डॉ. सय्यद यांनी संविधान बाबत विचार व्यक्त केले.
पारनेर येथे प्रजासत्ताक दिनी पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या संविधान मिरवणुकीचा प्रारंभ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथुन करण्यात आला. सजवलेल्या अश्वरथातून संविधानाचा मिरवणूक काढण्यात आली. संगीतमय ढोलताशाचा निनाद, मस्तिषकवर सफेद तिरंगी फेटे, महीला उपासक वर्गाची लक्षणीय उपस्थिती, डॉटर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. संविधान अमर रहो घोषणा देत मोठ्या उत्चवात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बच्चे कंपनीने पेहराव केलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पेहरावात असलेली बच्चे कंपनी उपस्थितांची लक्ष वेधून घेत होती.
भारतीय संविधानाची भव्य मिरवणूक सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. रफिक सय्यद होते. तर प्रमुख उपस्थिती बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर होते. यावेळी संघराज रूपवते, आमदार निलेश लंके, नगराध्यक्ष विजय औटी, पत्रकार संजय वाघमारे, माजी नगरसेवक नंदकुमार औटी, भारतीय मुक्ति मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, प्रचारक बाळासाहेब पातारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र पवार, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे, रेवण साळवे, गिरिश गायकवाड, माजी नगरसेवक डॉ. मुद्द्दसर सय्यद, नगरसेविका हिमानी नगरे, नगरसेविका नीता औटी, नगरसेवक भूषण शेलार, नगरसेवक अशोक, चेडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, डॉ.बाळासाहेब कावरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, आर पी आय तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, युवा नेते अमित जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
राजा हिंदुस्थानी यांचा देशभक्तिपर गायनाचा कार्यक्रम
पारनेरमध्ये संविधान दिन साजरा केला. हा एक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चांगला पायंडा पाडला असून तालुयात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाची मिरवणूक झाली पाहिजे तसेच संविधान हे डोयावर घेण्यापेक्षा डोयात घेतले पाहिजे. अनेकांना वारसा येतो परंतु आपण कोणाचा वारसा घेऊन पुढे आलो आहोत याचा अभ्यास त्यांचा नसतो.डॉटर आनंदराव आंबेडकर यांनी वारसा जपलेला आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
COMMENTS