अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे एंगेजमेंट सेरेमनी पार पडली, ज्यामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याचा गुरुवारी राधिका मर्चंटसोबत साखरपुढा झाला. अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे एंगेजमेंट सेरेमनी पार पडली, ज्यामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. एंगेजमेंटमध्ये अंबानी कुटुंबानेही जोरदार डान्स केला. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता, मुलगी ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल स्टेजवर नाचताना दिसत आहेत. अंबानी कुटुंबाच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे.
अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबातील जवळपास प्रत्येक कार्यक्रमात राधिका दिसते. राधिका मर्चंटचे वडील वीरेन मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतून केले. यानंतर तिने न्यूयॉर्कमधून राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले.
यापूर्वी २९ डिसेंबरला राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा सुपारीचा (गुलाल)/ रोका सोहळा पार पडला होता. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात हा कार्यक्रम झाला. राधिका मर्चंट प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगनाही आहे.
अनंत अंबानी याने अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि तो रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सशी संबंधित आहे. अनंत सध्या रिलायन्सच्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख आहेत.
#WATCH | The Ambani family dances at the ring ceremony of Anant Ambani and Radhika Merchant
— ANI (@ANI) January 20, 2023
The engagement ceremony was held at Mukesh Ambani's Mumbai residence 'Antilla' yesterday pic.twitter.com/mmNsI9fzkc
COMMENTS