पुणे / नगर सहयाद्री- पुणे जिल्ह्यातील आळंदीत काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी तिघांवर आळंदी पाेलिस ठाण्यात...
पुणे / नगर सहयाद्री-
पुणे जिल्ह्यातील आळंदीत काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी तिघांवर आळंदी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
प्राप्त माहितीनूसार दाखल तक्ररीत तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या असं सांगत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पूजा अर्चा करण्यात आली असेही तक्रारीत नमूद आहे.
पाेलिस म्हणाले या घटनेचा कसून तपास सुरु आहे. सध्या तिघांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान हा संवेदनशिल असल्याने आळंदी पाेलिसकाळजीपुर्वक तपास करीत आहेत. ही घटना दाेन ते तीन दिवसांपुर्वी घडली आहे.पाेलिसांनी तत्काळ गांभीर्य लक्षात घेत हालचाली सुरु केल्या.
COMMENTS