मुंबई । नगर सह्याद्री - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे नुकतेच आई बाबा झाले आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतर म्हणजेच ज...
मुंबई । नगर सह्याद्री -
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे नुकतेच आई बाबा झाले आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतर म्हणजेच जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये 2022 तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता आलिया पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहे.
आलिया भट्टची मुलगी राहा आता दोन महिन्यांची झाली आहे. आतापर्यंत तिने राहाचा चेहरा आपल्या चाहत्यांना दाखवलेला नाही. मात्र, नुकताच आलियाने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे या व्हिडिओमुळे चाहत्यांना तिच्या गरोदरपणावरून प्रश्न पडला आहे.
आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या हातात दोन फुले दिसत आहे. हे फुलं तिने अशा पद्धतीने हातात धरले आहेत, ज्यावरून ती ‘2’ हा आकडा दाखवण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘2.0 स्टे ट्युन्ड’.
आलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे आणि त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे ती पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘दुसरे बाळ येणार आहे का’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘ब्रह्मास्त्र 2.0’ची घोषणा होणार आहे का, असे दुसऱ्याने म्हटले आहे. नेमकी कोणती घोषणा करणार आहेस, याची फार उत्सुकता आहे.
COMMENTS