रुग्णालयात चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट खाली आदळल्याची घटना. पुणे / नगर सहयाद्री- विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल पासुन पुणे दौऱ्यावर हो...
रुग्णालयात चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट खाली आदळल्याची घटना.
पुणे / नगर सहयाद्री-
विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल पासुन पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात काल अजित पवार यांनी हर्डीकर रुग्णालयामध्ये उद्घाटना प्रसंगी हजेरी लावली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट खाली आदळल्याची घटना घडल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. भयानक घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून सर्व बाहेर निघालो. असा अपघाताचा किस्सा अजित पवार यांनी सांगितला.
अजित पवार हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. आज अजित पवार यांनी बारामतीत तालुक्यातील पवई माळ येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधताना अजित पवार म्हणाले, पुणे येथील हर्डीकर रुग्णालयामध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. त्यानंतर काही क्षणात लिफ्ट चालू होऊन पुन्हा ती खालच्या बाजूला आदळली'.'या भयानक घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो.
आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहावे ना म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगतो हा किस्सा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पवई माळ येथील जाहीर सभेत सांगितला.
COMMENTS