पुणे / नगर सहयाद्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आह...
पुणे / नगर सहयाद्री
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आहे. पुणे आणि नाशिकमध्ये भाजप आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे.
नाशिकमध्ये भाजप समर्थकांनी अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. तर पुण्यातही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. विशेष म्हणजे बारामतीत अजित पवार यांच्या घरासमोरही हे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्या अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.तर अजित पवारांविरोधात घोषणाबाजीही केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान,राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार वक्तव्य केलं.संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
COMMENTS