मुंबई / नगर सहयाद्री- संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही.मी माझ्या...
मुंबई / नगर सहयाद्री-
संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही.मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे म्हणत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणाले, मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही. भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हतेच असं विधान करत अजित पवार यांनी संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते असं विधान केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यरक्षक असलेल्या जीआरचे पुरावे दाखवत मी विधानावर ठाम असल्याचे विधान केले होते. त्याच वेळी त्यांनी धर्मवीर नावाचे अनेक लोक आहेत. काहींच्या नावाचे चित्रपट निघाले असं म्हणत अजित पवार यांनी धर्मवीर वादावर स्पष्टीकरण देत भाजपला काही सवाल केले होते.
अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच असे विधान केल्यानंतर त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती, त्यावर अजित पवार यांनी ते आमचे नेते आहेत आम्ही त्याच्या आदेशाचे पालन करू असे म्हंटले आहे.
COMMENTS