शंकर मिश्रा यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले होते की, पीडितेने स्वतः शंकर मिश्रा यांच्या सीटवर लघवी केली होती.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
एअर इंडिया प्रकरणातील पीडित महिलेने आरोपी शंकर मिश्रा यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. शंकर मिश्रा यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले होते की, पीडितेने स्वतः शंकर मिश्रा यांच्या सीटवर लघवी केली होती. ज्यावर पीडित महिलेचे वक्तव्य समोर आले आहे. पीडितेने हे आरोप खोटे आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. शंकर मिश्रा यांच्यावर एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेच्या सीटवर लघवी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शंकर मिश्राला अटक करण्यात आली. आता शंकर मिश्रा यांच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की, पीडितेने स्वत: त्यांच्या सीटवर लघवी केली होती.
शंकर मिश्रा यांच्या वकिलाने सांगितले की, पीडित महिला गेल्या ३० वर्षांपासून भरतनाट्यम नृत्यांगना करत आहे आणि हे सामान्य आहे की त्यांना मूत्रमार्गात असंयमीची समस्या असू शकते. शंकर मिश्रा यांच्या या दाव्यावर महिलेने तिच्या वकिलामार्फत निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये महिलेने म्हटले आहे की, "आमच्या लक्षात आले आहे की पटियाला हाऊस कोर्टात आरोपीच्या वतीने बदनामीकारक आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि अत्यंत अपमानास्पद आहेत."
पीडितेच्या वकिलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आरोपी, त्याच्या मूर्खपणाच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करण्याऐवजी, पीडितेला त्रास देण्यासाठी तिच्याविरुद्ध दिशाभूल करणारा प्रचार करत आहे". विशेष म्हणजे एअर इंडिया प्रकरणात डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. नोटीसमध्ये, डीजीसीएने एअर इंडियाने या प्रकरणाची चुकीची हाताळणी केल्याचा दावा केला आहे.
२६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून नवी दिल्लीच्या फ्लाइटमध्ये आरोपी शंकर मिश्रा याने पीडित महिलेच्या सीटवर कथितपणे लघवी केली होती. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शंकर मिश्रा याला यापूर्वी बेंगळुरू येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
COMMENTS