एंटरटेनमेंट । नगर सह्याद्री - फिल्ममेकर एकता कपूर तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच एकता रिद्धी डोग्राला तिच्या नवीन प्...
एंटरटेनमेंट । नगर सह्याद्री -
फिल्ममेकर एकता कपूर तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच एकता रिद्धी डोग्राला तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देण्यासाठी आली होती. यादरम्यान तिने ऑफ शोल्डर सॅटिनचा ड्रेस परिधान केला होता. एकताच्या या आउटफिटची ट्रोलर्स खूप खिल्ली उडवत आहे. लोक म्हणतात एकताला चांगल्या डिझायनरची आवश्यकता आहे.
गेल्या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्या एकता कपूरला OTT प्लॅटफॉर्मवर अश्लील सामग्री दिल्याबद्दल फटकारले होते. बिहारमधील बेगुसराय येथील माजी सैनिक शंभू कुमार यांनी एकता कपूरविरोधात तक्रार दाखल केली होती.
कुमार यांनी ट्रायल कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत आरोप केला होता की, एकता कपूरच्या OTT प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजीच्या XXX सीझन-2 मध्ये एका सैनिकाच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवली होती. यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या आहे. न्यायालयाने एकताविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.
या प्रकरणात दिलासा मिळावा म्हणून एकताने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकतावर टिप्पणी करताना न्यायालयाने म्हटले होते- तुम्ही आजच्या तरुणांचे मन कलुषित करत आहात. आपण बनवलेल्या वेब सिरीज तरुणांना बिघडवण्याचे काम करत आहेत.
COMMENTS