साईभक्तांवर काळाचा घाला; दहा भाविक ठार

  सिन्नर-शिर्डी महामार्गावर ट्रक-ट्रॅव्हल्स बसचा अपघात  शिर्डी / नगर सह्याद्री - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते शिर्डी महामार्गावर झालेल्या भीष...

 


सिन्नर-शिर्डी महामार्गावर ट्रक-ट्रॅव्हल्स बसचा अपघात 

शिर्डी / नगर सह्याद्री -

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा ठार झाले. शुक्रवारी सकाळी ट्रक आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात हा अपघात झाला. यामध्ये बसमध्ये प्रवास करणारे दहा ठार झाले तर २५ ते ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला असून, बसची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. नाशिक-शिर्डी महामार्गावर मुंबईहून शिर्डीकडे येणार्‍या पर्यटक बसची ट्रकला समोरासमोर धडक झाली. यावेळी बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातातील जखमींना तात्काळ जवळच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला, त्या रस्त्यावर रस्ता दुभाजक आहे. दोन्ही बाजुला (येणारे-जाणारे) रस्ते रूंद आहेत. असे असतानाही समोरासमोर धडक कशी झाली, असा प्रश्न तेथील प्रवाशांनाही पडला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही बस मुंबईतील अंबरनाथ येथून प्रवाशांना शिर्डीला दर्शनासाठी घेऊन जात होती. सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.


COMMENTS

Name

Accident,35,Ahmednagar,7238,Akole,20,braking,43,Breaking,5116,Business,4,corona,560,Crime,1433,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1331,Epaper,29,Health,395,indan,8,India,1213,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4844,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3018,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,125,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: साईभक्तांवर काळाचा घाला; दहा भाविक ठार
साईभक्तांवर काळाचा घाला; दहा भाविक ठार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh68oYBBmqsoIDg4g1U2Su1GZu46kkeq1vqyJX41O6mmVVeswhlD7tPYBGPRNMHIB-S3250OWEnd6H8XlQpMnxpI5ihxCr0Fe2keP5OpiZ-93ScSWNURcMMXlUs6_vozTjiOky70x6tICVF-QaTQO6IZlMPtMoBSEXurv5TahOU1zQ2yBfVB6TqnyWM/w640-h480/nashik-shirdi-bus-accident-photos-10-lost-life-tourist-bus-on-nashik-shirdi-highway-in-maharashtra-96960588.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh68oYBBmqsoIDg4g1U2Su1GZu46kkeq1vqyJX41O6mmVVeswhlD7tPYBGPRNMHIB-S3250OWEnd6H8XlQpMnxpI5ihxCr0Fe2keP5OpiZ-93ScSWNURcMMXlUs6_vozTjiOky70x6tICVF-QaTQO6IZlMPtMoBSEXurv5TahOU1zQ2yBfVB6TqnyWM/s72-w640-c-h480/nashik-shirdi-bus-accident-photos-10-lost-life-tourist-bus-on-nashik-shirdi-highway-in-maharashtra-96960588.png
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/01/ahmednagar-shirdi-bhavik-apghat.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/01/ahmednagar-shirdi-bhavik-apghat.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content