अहमदनगर । नगर सह्याद्री येथील प्रसिद्ध बेडेकर क्लासेसचे संचालक अविनाश बेडेकर (वय 79) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. पहिली एकांकिका स्...
अहमदनगर । नगर सह्याद्री
येथील प्रसिद्ध बेडेकर क्लासेसचे संचालक अविनाश बेडेकर (वय 79) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. पहिली एकांकिका स्पर्धा घेऊन त्यांनी या स्पर्धांची नगरमध्ये सुरूवात केली. त्यांच्या पश्चात पत्नी, ज्येष्ठ बंधू श्रीकांत बेडेकर, अस्मिता आणी श्रद्धा या दोन मुली, मुलगा व प्रसिद्ध निवेदक प्रसाद बेडेकर, पुतण्या हिंद सेवा मंडळाचे संचालक सुजित बेडेकर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
56 वर्षे अव्याहतपणे ते शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्याची ओळख होती. जिल्ह्यातील अनेक शाळांतून 10 वीच्या विद्यार्थ्यांना विशेष कार्यशाळेतून त्यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी विषयाचे उत्तम अध्यापक असलेले बेडेकर यांची व्याकरण शिकविण्याची हातोटी खास होती. शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांची साहित्यिकांमध्येही उठबस होती. एक उत्तम कवी म्हणूनही त्यांना ओळखले जात. नाट्य शलाका संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नगरमध्ये प्रथम एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
COMMENTS