अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या २०२३ ते २०२८ सालच्या संचालकपदासाठीच्या निवडणुकीसाठी हस्तीमलजी मुनोत प्रणित जनसेवा प...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या २०२३ ते २०२८ सालच्या संचालकपदासाठीच्या निवडणुकीसाठी हस्तीमलजी मुनोत प्रणित जनसेवा पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ मार्केट यार्डमधील श्री हनुमान मंदिरात हस्तीमलजी मुनोत हस्ते पुष्पहार अर्पण करुन व प्रचाराचे पत्रक ठेवून करण्यात आला. याप्रसंगी अनिल पोखरणा यांच्या हस्ते नारळ वाढवून मार्केट यार्डमधील व्यापार्यांच्या भेटीगाठीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आनंदराम मुनोत, संजीव गांधी,सीए मोहन बरमेचा, संजय बोरा, अमित मुथा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, विजय कोथिंबीरे, अनिल पोखरणा, श्रीमती मीनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, सुभाष बायड, सुभाष भांड, कमलेश भंडारी, आदि उपस्थित होते.
हस्तीमल मुनोत म्हणाले, अहमदनगर मर्चंटस् बँकेची सहकारी बँक क्षेत्रातील प्रगती व नेत्रदिपक अशी गरुडझेप हे आपणा सर्वांचेच यश आहे. मर्चंटस् बँकेचे सभासद, ग्राहक, खातेदार व कर्मचारी या सर्वांनी बँकेच्या वाटचालीमध्ये विश्वासाचे व पाठबळाचे भक्कम पाठबळ दिले आहे. गेल्या ७ वर्षांपासून मर्चंटस् बँकेची वाटचाल ही अत्याधुनिकतेकडे सुरु असून, ग्राहकांना सातत्याने चांगल्या सेवा व सुविधा उपलब्ध झाल्याने बँकेच्या प्रगतीचा आलेख हा नेहमीच उंचावत राहिलेला आहे. बँकेच्या आश्वासनाची १०० टक्के पुर्तता करण्याचा सर्व संचालकांनी प्रयत्न केला असून, हे सर्व आपणास माहित आहेच असे सांगितले.
अनिल पोखरणा म्हणाले, बँकेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २५०० रु. ठेव पावती, ४० वर्षे पुर्ण झाल्यानंतर ४१०० रु. ठेवपावती सभासदांना दिली आहे. या व्यतिरिक्त बँकेच्या सभासदांना हृदयशस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, किडणी प्रत्यारोपण, ब्रेन हॅम्रेज आदिंकरीता १५ हजार रुपये न परताव्याचे अर्थसहाय्य केले जाते. या व्यतिरिक्त सभासदांच्या मुला-मुलींना १५ हजार रुपयांचे न परतावा अर्थसहाय्य दिले जाते. एखाद्या सभासदाचे अकाली अथवा अपघाती निधन झाल्यास पती किंवा पत्नीला ३० महिन्यांपर्यंत दरमहा १ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करते.
संजीव गांधी म्हणाले, सर्व सभासदांचा प्रधानमंत्री अपघात विमा बँकेने उतरविला असून, त्यांचे प्रिमियम हे मर्चंटस् बँक भरते, त्याचाही अनेकांनी लाभ मिळविलेला आहे. शिस्तबद्ध कारभार व कामकाज यामुळे बँकेची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळातही बँकेने उत्कृष्ट परंपरा कायम राखली असून, मर्चंटस् बँकेचा रिझर्व्ह फंडही भक्कम आहे. बँकेच्या सर्व शाखा या स्व:मालकीच्या असून, मागील सुवर्ण महोत्सवामध्ये बँकेने डाळमंडई शाखेची स्व:मालकीची प्रशास्त वास्तू साकारली आहे. आनंदराम मुनोत म्हणाले, आपल्या सर्वांच्या आजपर्यंतच्या प्रेमाने पुढील ५ वर्षांसाठी बँकेच्या प्रगतीचे नवीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. सध्याच्या युगामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान अतिशय प्रगत झाले आहे, यामुळेच बँकींग सेवेत सर्वोत्तम सेवा मिळते. मर्चंटस् बँकही यामध्ये नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आणून त्याचा वापर करुन त्याची सेवा व सुविधा याचा ग्राहकांना लाभ देत आहे. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास मर्चंटस् बँकेने डिजिटील बँकींग, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, युपीआय, आयएमपीएस, आरटीजीएस, एनईएफटी, रुपे डेबिट कार्ड, भारत बिल पेमेंट, अशा अनेक सोयी-सुविधा परिपुर्णपणे देत आहेत. या व्यतिरिक्त भविष्यात नवनवीन ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासाठी व्यापारी वर्गासाठी कार्पोरेट बँकींग, डायरेट सिटीएस, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन लोन सिस्टीम, कोअर बँकींग व सर्व सिस्टीमचे अत्याधुनिकरण करण्याचा सर्वांचा मानस आहे. नुसते आश्वासन न देता, त्याची वचनपुर्ती करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचे हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले. यापुढील काळात देखील सर्व सभासदांनी आम्हाला आजपर्यंत दिलेले पाठबळ असेच कामय द्यावे, आम्ही व आमच्या जनसेवा पॅनेलचे सर्व सहकारी निश्चितच भविष्यात आपल्या सर्व योग्य त्या मागण्या निश्चितपणे पूर्ण करु, असे सांगून जनसेवा पॅनलला मतदान करण्याचे आवाहन केले. मार्केड यार्डमधील सर्व व्यापार्यांना जनसेवा पॅनेलच्या उमेदवारांनी समक्ष भेटून मतदारांना आवाहन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने व्यापारीवर्ग उपस्थित होता. फेब्रुवारी २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मर्चंटस् बँकेच्या संचालकपदासाठी निवडणुक होणार आहे.
COMMENTS