मुंबई / नगर सहयाद्री- अग्निशामक पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची भरती होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रि...
मुंबई / नगर सहयाद्री-
अग्निशामक पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची भरती होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात होणार आहे. दहिसरच्या भावदेवी मैदानात सकाळी ६ वाजल्यापासून सरळसेवा वॉक इन सिलेक्शन पद्धतीने होणार आहे.
भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी मैदानात सुमारे १६५ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात आले आहे. भरतीमध्ये उमेदवारांना धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.६ महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देऊन त्यानंतर सेवेत रुजू केले जाणार आहे.
COMMENTS