जळगाव / नगर सहयाद्री मुंबई - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघात मुलाच्या दुचाकीवर बसलेली गृहिणी खाली प...
जळगाव / नगर सहयाद्री
मुंबई - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघात मुलाच्या दुचाकीवर बसलेली गृहिणी खाली पडली आणि मागून सुसाट वेगात आलेला ट्रक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
जळगावातील समतानगरनगरमधील रहिवासी अल्ताफ बेग यांच्या पत्नी जुबेदाबी मुलगा कामील बेग (वय २६) यांच्यासोबत सावदा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या हेात्या. साखरपुडा आटोपून मायलेक दुचाकीवरून सायंकाळी जळगावला येण्यासाठी निघाले. नशिराबादकडे येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. मुलाच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची आई महामार्गाच्या मधोमध फेकल्या गेल्या. खाली पडताच त्यांच्या अंगावरून सुसाट ट्रक गेला. ट्रकच्या चाकाखाली आल्याचे त्या जागीच ठार झाल्या. मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
जुबेदाबी यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवल्यानंतर त्यांचा दीर नईम बेग हसन तेथे पोचला. मृतदेह दाखवताच त्याला रडू कोसळले. कुटुंबातील इतरांसह नातेवाइकांना मृतदेह न बघताच परत घरी पाठवून देण्यात आले. जुबेदाबी यांच्या पश्चात पती अल्ताफ, मुलगा कामील बेग, लहान मुलगा मोईन, मुली अल्फिया व हलिमा असा परिवार आहे.
COMMENTS