सुपा | प्रतिनिधी पारनेर तालुका मेडिकल प्रॅटिशनर असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी राहुलदादा शिंदे पाटिल यांचे कट्टर समर्थक डॉ. अजय येणारे यांची नि...
पारनेर तालुका मेडिकल प्रॅटिशनर असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी राहुलदादा शिंदे पाटिल यांचे कट्टर समर्थक डॉ. अजय येणारे यांची निवड करण्यात आली. माजी उपाध्यक्ष डॉ. गणेश सांगळे, अध्यक्ष डॉ. संजय बांडे, डॉ. भास्कर शिरोळे, डॉ. स्मिता शिरोळे, डॉ. प्रकाश लाळगे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
राहुल शिंदे पाटिल यांनी या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी सरपंच बंटी साबळे, उपसरपंच बाबा जवक, माजी सरपंच शरद सरोदे, दत्ता लोणकर, काका देशमुख, सतिश जवक, संतोष सरोदे, मोहन लोणकर, संदिप देशमुख, कैलास गाढवे, संचालक बापु जवक, विनोद जवक, विलास जवक, प्रमोद जवक यांच्या वतीने डॉ येणारे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. येणारे यांचे सुपा परिसरातील ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.
COMMENTS