शिवसेना कुणाची आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना कुणाची आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेलं तात्पुरते 'मशाल' चिन्ह देखील जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
शिवसेना कोणाची आणि सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी तूर्तास लांबणीवर पडलेली आहे. शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत उद्धव ठाकरेंचा लढा सुरू असतानाच, तात्पुरते चिन्ह मशालही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिलेले मशाल चिन्हही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याविरोधात समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ठाकरे गटाला समता पार्टीचे मशाल हे चिन्ह दिल्याने मतदार संभ्रमात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला दुसरे चिन्ह दिले जावे, अशी मागणी समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी केली आहे.
याआधीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह दिल्याच्या विरोधात समता पार्टी दिल्ली हायकोर्टात गेली होती. पण ती याचिका फेटाळून लावली होती. समता पार्टीची मान्यता रद्द केल्यानंतर त्यांनी निवडणूक चिन्हावर कोणताही अधिकार सांगितला नाही, असे त्यावेळी नमूद करण्यात आले होते.
शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल चिन्ह दिल्याच्या विरोधात समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे. दिल्ली हायकोर्टात आम्ही याचिका केली होती. आता सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. ते चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असे समता पार्टीचे अध्यक्ष मंडल यांनी सांगितले आहे.
COMMENTS