राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विराेधकांची युद्धपातळीवर रणनिती सुरु असल्याचे चित्र आहे.
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विराेधकांची युद्धपातळीवर रणनिती सुरु असल्याचे चित्र आहे. भाजप सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी देणार असल्याची चर्चा आजही नगर जिल्ह्यासह नाशिक मतदारसंघात आहे. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे हे आज अर्ज भरणार आहे. दरम्यान भाजपाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. काॅंग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे हे भाजपच्या वाटेवर असल्याची आजही चर्चा आहे. त्यातच सत्यजीत तांबे यांनी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त केलेले ट्विट यामुळे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराचा सस्पेनस कायम राहिला आहे.
नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे हे आज दुपारी २ वाजता नाशिक येथे अर्ज भरणार आहे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या स्मृतीस्थळी जात तांबे यांनी अभिवादन केले आहे. युवा नेेते सत्यजीत तांबे देखील डॉ. सुधीर तांबे यांच्या समवेत उपस्थित हाेते.
त्यानंतर दाेन्ही नेते वेगवेगळ्या वाहनांतून संगमनेरहून नाशिकला रवाना झाले आहे. यावेळी माध्यमांनी त्यांनी गराडा घातला परंतु तांबे पिता-पुत्रांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले आहे. यावेळी त्यांच्या निकटवर्तींयांनी आज दुपारी चार वाजता नाशिक येथे तांबे यांची पत्रकार परिषद हाेईल अशी माहिती दिली आहे.
भाजप सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. भाजपने अद्यापही त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घाेषणा केलेले नाही. भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर न केल्याने तांबे यांच्याबद्दलचा सस्पेंन्स कायम राहिला आहे. त्यांच्या आजच्या ट्विटची देखील चर्चा हाेऊ लागली आहे.
दरम्यान डॉ. सुधीर तांबे हे मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आजारी असल्याने डाॅ. तांबे हे साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहे. थोरात साहेब मतदारसंघात परतल्यावर मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार अशी माहिती तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
'शक्य तितकी जोखीम घ्या. जिंकलात, तर नेतृत्व कराल. हरलात, तर मार्गदर्शन कराल.'
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) January 12, 2023
स्वामी विवेकानंद यांचं हे वाक्य मी ह्रदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलं आहे. विद्यार्थी संघटनेत कार्यरत असल्यापासून नेहमी प्रेरीत करणारे स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन.#SwamiVivekanandaJayanti pic.twitter.com/Vlu57KtzLD
COMMENTS