मुंबई / नगर सहयाद्री- लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' सर्वात प्रसिद्ध जोडी राणादा आणि पाठकबाई लग्न बंधनात अडकले आहेत. राणा आणि...
मुंबई / नगर सहयाद्री-
लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' सर्वात प्रसिद्ध जोडी राणादा आणि पाठकबाई लग्न बंधनात अडकले आहेत. राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचे लाखो चाहते आहेत. आता त्या दोघांच्या जोडीला खऱ्या आयुष्यात रंग आला आहे. त्या दोघांना परत छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक आणि अक्षया घराघरात पोहोचले होते. या मालिकेनंतर ते दोघं परत एकदा पडद्यावर दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना होता. इतकच काय तर कधी तरी पुन्हा एकदा हार्दिक आणि अक्षयानं मालिकेत काम करावे अशी इच्छा होती.
हार्दिक आणि अक्षया हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र, यावेळी मालिकेसाठी नाही तर झी मराठीवर 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. यावेळी अक्षया आणि हार्दिकच्या चाहत्यांना त्यांना वेगवेगळे मजेशीर खेळ खेळताना पाहता येणार आहे. हा एपिसोड 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्तानं दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे. हार्दिक आणि अक्षया यांची जुगलबंदी पाहून नक्कीच त्यांच्या चाहत्यांना आनंद होईल.
COMMENTS