मुंबई । नगर सह्याद्री - राज्यात गेल्या दिवसांपासून शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. अनेक दिवसांपासून चर्चा आहे की शिवशक्ती आणि भीमशक्...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यात गेल्या दिवसांपासून शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. अनेक दिवसांपासून चर्चा आहे की शिवशक्ती आणि भीमशक्ती बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीची काही दिवसांपूर्वी युतीची घोषणा झाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मध्यंतरी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची बैठकही झाली. उद्या दादरमध्ये आंबेडकर हाॅलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत दोन्ही प्रमुख नेते आपली भूमिका मांडणार असल्याचे कळते.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला काँग्रेस-राष्ट्रवादीचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी महायुतीत सामील होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेणार असून साऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महायुतीबाबत काय भाष्य केले जाईल, हे पाहावे लागणार आहे.
COMMENTS