एकत्रिकरणामुळे ताकद वाढण्याबरोबरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार ः कदम अहमदनगर | नगर सह्याद्री हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्य...
एकत्रिकरणामुळे ताकद वाढण्याबरोबरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार ः कदम
अहमदनगर | नगर सह्याद्रीहिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना आणि वंचित आघाडी यांच्या युतीमुळे शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याने राज्यात एक नवे समिकरण निर्माण झाले आहे. या युतीमुळे दोन्ही संघटना मजबूत होतील. कार्यकर्त्यांच्या एकत्रिकरणामुळे ताकद वाढण्याबरोबरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, यासाठी शिवसेना व वंचित आघाडी काम करत आहेत. यापुढे एकदिलाने काम करुन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. नगरमधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे शिवसेना पदाधिकार्यांनी स्वागत करुन पुढील दिशा ठरविली आहे. यापुढे प्रत्येक कार्यक्रम, उपक्रम एकत्रितपणे केले जातील, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याची घोषणा झाली. त्या अनुषंगाने नगरमध्ये वंचितच्या पदधिकार्यांनी शिवसेना कार्यालयास भेट दिली. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे आदी उपस्थित होते.
प्रतिक बारसे म्हणाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.प्रक़ाश आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या निर्णयानुसार आता वंचित व शिवसेनेची युती झाली असल्याने राज्यात मोठी ताकद निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांच्या ध्येय-धोरणानुसार एकत्रित काम करुन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्ते काम करतील. नगरमध्ये शिवसेनेचे काम चांगल्यापद्धती सुरु असून, आता वंचितच्या बरोबरीने त्यात आणखी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, योगेश साठे यांनी मनोगतातून शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे स्वागत केले. यावेळी वंचितचे शनेश्वर पवार, शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, महासचिव सचिन पाटील, जीवन पारधे, प्रविण आरे, अमर निरभवणे, मनोहर जिंदम, अजिम शेख, भाऊ साळवे, अमोल काळपुंड, मारुती पाटोळे, धनश्री शेंडगे, मंदाकिनी बेडेकर, अॅड.राणी भुतकर, सेनेचे गौरव ढोणे, सुरेश क्षीरसागर, अशोक दहिफळे, पप्पू भाले, संतोष तनपुरे, मुन्ना भिंगारदिवे, प्रताप गडाख, सुशांत कोकाडे, नरेश भालेराव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS