निघोज | नगर सह्याद्री - २१ जानेवारी २०१७ रोजी निघोज गावचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची बसस्थानक परिसरात न...
निघोज | नगर सह्याद्री-
२१ जानेवारी २०१७ रोजी निघोज गावचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची बसस्थानक परिसरात निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ शनिवार दि. २१ रोजी निघोज येथील सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी या हत्येचा निषेध केला. तसेच काळा दिवस पाळण्यात आला.
गेली पाच वर्षांपासून निघोज ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायीक स्वयंस्फूर्तीने दि. २१ जानेवारी रोजी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून हत्येचा निषेध करुन संदीप पाटील वराळ यांना श्रद्धांजली वाहत असतात. सकाळपासून सर्व व्यवहार बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.
संदीप पाटील वराळ यांचे गाव विकासासाठी मोठे योगदान आहे. गेली सात ते आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय कारकीर्दीत गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांनी पन्नास वर्षे निघोज सोसायटी व ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध चेअरमन व सरपंचपद भुषवून मोठे योगदान दिले आहे. वडील मच्छिंद्र पाटील वराळ यांनी पंचायत समितीचे सदस्य, तसेच सहकार, सामाजिक, शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले आहे.
संदीप पाटील वराळ यांच्या पत्नी पुष्पाताई वराळ पाटील या सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. संदीप पाटील यांचे मोठे बंधू सचिन पाटील वराळ हे ग्रामपंचायत सदस्य व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून कार्यरत आहेत. संदीप पाटील वराळ यांच्या भावजयी चित्राताई सचिन वराळ पाटील या गावच्या सरपंच आहेत.
अशाप्रकारे गेली ८० वर्षांपासून वराळ पाटील कुटुंबीय गाव विकासासाठी मोठे योगदान देत आहे. २१ जानेवारी २०१७ रोजी एस टी बस स्थानक परिसरात संदीप पाटील वराळ यांची हल्लेखोरांनी निघृण हत्या केली. या घटनेला सहा वर्षं झाले आहेत. प्रत्येक वर्षी या दिवशी ग्रामस्थ व्यवहार बंद ठेवून हत्येचा निषेध करीत असतात. तसेच सायंकाळी सहा वाजता गावातून कँडल मार्च काढून सायंकाळी संदीप पाटील चौक येथे एकत्र येऊन संदीप पाटील वराळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.
शनिवार दि.२१ रोजी सकाळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन कार्यालयात संदीप पाटील वराळ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे तसेच ग्रामस्थ व गाव व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
COMMENTS