सभापती काशिनाथ दाते यांच्या संकल्पनेतून दोन्ही योजनांना निधी पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील खडकवाडी, पोखरी पहिल्या पाणी योजना ...
सभापती काशिनाथ दाते यांच्या संकल्पनेतून दोन्ही योजनांना निधी
पारनेर तालुक्यातील खडकवाडी, पोखरी पहिल्या पाणी योजना चालणार सोलर पंपावर आता कार्यान्वित होणार असल्याची माहिती सभापती काशिनाथ दाते यांनी दिली आहे. पारनेर तालुयात कोटयावधी रूपये खर्चून राबविण्यात आलेल्या पाणी योजना वीजेचे बिल थकल्यामुळे कालांतराने बंद होतात. ते टाळून नियमित पाणी पुरवठा व्हावा व त्यासाठी विजेचा खर्चही नसावा यासाठी तालुयातील खडकवाडी व पोखरी पाणी योजना सोलर पंपावर चालविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या संकल्पनेतून या दोन गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. पाणी योजनेसाठी विजेच्या बिलांची समस्या नेहमीच येते. त्यावर मात करण्यासाठी काशिनाथ दाते यांनी यापूर्वी तालुयातील म्हसोबा झाप तसेच नगर तालुयातील चिचोंडी पाटील येथील पाणी योजनांना सोलर पंपांसाठी निधी उपलब्ध करून त्या सोलर पंपावर कार्यान्वीत केल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता तालुयातील खडकवाडी व पोखरी येथील योजनांना निधी देण्यात आला आहे.
पाणी योजनांच्या पंपांसाठी वापरण्यात येणारे वीजेचे बील कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायत भरू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने कोटयावधी रूपये खर्चून राबविलेली पाणी योजना उपयोगात येत नाही. व नागरीकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. ते टाळण्यासाठी दाते यांनी सोलर पंपांचा प्रयोग राबविला असून या प्रयोगाचे कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगामधून खडकवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर पंप बसविण्यासाठी १४ लाख, पोखरी पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर पंप बसविण्यासाठी १० लाख, वडगांव सावताळ येथील गावठाण कुंभारगल्ली पाण्याची टाकी बांधकामासाठी १ लाख ७५ हजार, वडगांव सावताळ येथील खंडागळे वस्तीवर पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी १ लाख ७५ हजार, वारणवाडी येथील पोटभरी पाण्याची टाकी बांधकाम व वितरण व्यवस्थेसाठी १ लाख ७५ हजार रूपयांचा निधी मंजुर झाला आहे तसेच टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्यांकरताही १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे दाते यांनी सांंगितले.
पारंपरिक स्त्रोत सोलरचा वापर वाढविणे
आवश्यक: सभापती काशिनाथ दाते
विविध पाणी योजनांची वीजेची बीले थकल्यामुळे योजना बंद पडतात. त्यावरील कोटयावधींचा खर्च वाया जातो. संबंधित गावामध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा पुढे येतो. ते टाळण्यासाठी सोलर पंपावर पाणी योजना राबविण्याचे धोरण हाती घेणे गरजेचे आहे. सोलरचा वापर वाढल्यास वीजेचे बीलाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे, असे बांधकाम व कृषी समिती माजी सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले.
COMMENTS