मोशी पुणे, सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सवा दरम्यान ग्राहकांची पसंती: गणेश मुंगसे सुपा | नगर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यात सर्व व्यवसायात अग...
मोशी पुणे, सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सवा दरम्यान ग्राहकांची पसंती: गणेश मुंगसे
अहमदनगर जिल्ह्यात सर्व व्यवसायात अग्रेसर असणारे नाव म्हणजे ऑग्रोशाईन शेततळे कागद, ही नव्याने सुरू झालेली ब्रॅन्ड कंपनी कन्हैया इन्डस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जगभरात आज घडीला अधिक उत्पादनाची मालिका देत प्लॅस्टिक उद्योगात नावलौकिक मिळवला असून नुकत्याच मोशी पुणे, सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवा दरम्यान ग्राहकांची मोठी पसंती मिळाली असल्याचे व्यवस्थापक गणेश मुंगसे यांनी सांगितले.
कंपनीने सन २०१८पासून ऑग्रोशाईन या ब्रॅन्ड अंतर्गत शेततळे प्लास्टिक कागद निर्मितीला सुरूवात केली. ताडपत्री विविध प्रकारच्या जाळ्यांचे (नेट) कंपनीतर्फे निर्मिती होते. सन २००१ पासून ही कंपनी व्यवसायात अग्रेसर असून उद्योगात कंपनीची चांगली वाटचाल सुरू आहे.
संगणीकृत प्रणाली स्व:हाचे १२ कारखान्यात प्रशस्त दालन आहे. ही सर्व उत्पादने (आय एस आय) प्रमाणित आहेत. व्यक्तिगत गरजेच्या शेततळ्यानुसार कागद बनवून दिला जातो. उच्च तपमानात अत्यंत टिकाऊ क्षमतेच्या उत्पादनास पाच वर्षे वॉरंटी दिली जाते. त्यासाठी शासकीय अनुदानही मिळते. शेतीसाठी पाणीसाठा, मत्सल्य पालन असे बहुउद्देशीय प्रकल्प उभारणीला उद्योजकांकडून या कागदाला मोठी मागणी आहे.
कंपनीने ३०० मायक्रोन, ४०० मायक्रोन, ५०० मायक्रोन (आय एस आय) पेपर उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये पाणी साठवण, मजबूत जोड, सुर्य किरणांपासून सुरक्षा, उत्यल्प बाष्पीभवन अशा महत्वपूर्ण बाबींचा विचार केला आहे. कंपनीने अल्प वेळात राज्यस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये भरपूर प्रमाणात शेततळ्याच्या कागदाची विक्री केली आहे.कंपनीने पुणे मोशी येथे व सिल्लोड येथे किसान ऑग्रो शो स्टॉल लावला होता. यादरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी मंत्री, शेतकरी व कृषी अधिकारी यांनी स्टॉलला भेट दिली असल्याचे मुंगसे यांनी सांगितले.
COMMENTS