पन्नास हजार रुपयांची बक्षीसे जिंकत बालकलाकारांनी दाखवली अदाकारी निघोज | नगर सह्याद्री निघोज येथील कलाप्रेमी ग्रामस्थ आयोजित भव्य रेकॉर्ड डा...
पन्नास हजार रुपयांची बक्षीसे जिंकत बालकलाकारांनी दाखवली अदाकारी
निघोज येथील कलाप्रेमी ग्रामस्थ आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नृत्य डान्स जवळा व मुंबई येथील कार्तिकी बदके मुंबई यांना प्रथम क्रमांकांचे ५ हजार ५५५ रुपये बक्षीस विभागून देण्यात आले.
पारनेर तालुयातील निघोज येथील कलाप्रेमी ग्रामस्थ आयोजित भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन मकरसंक्रांतीच्या दिवशी करण्यात आले होते. गेली वीस वर्षांपासून तिळगुळ घ्या गोड बोला अशाप्रकारे या कार्यक्रमाचे स्वरूप असून मुंबई, नगर, पुणे जिल्ह्यातील ४८ संघानी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. सायंकाळी ७ वाजता कन्हैया भजनी मंडळाचे अध्यक्ष नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भजने गात या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोन हजार पेक्षा जास्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री दिड वाजता बक्षीस समारंभ होउन संपन्न झाला. द्वितीय क्रमांक बक्षीस ४ हजार ४४४ रुपये ईश्वरी राजेंद्र जठार व न्यू इंग्लिश स्कूल निघोज यांना विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांक बक्षीस ३ हजार ३३३ रुपये रिदम डान्स कॅडमी ओतूर व दुर्वा ढवळे यांना विभागून देण्यात आले. चतुर्थ क्रमांक बक्षीस २ हजार २२२ रुपये ईरा इंटरनॅशनल ग्रुप जवळा व कलाश्री डान्स ग्रुप निघोज यांना विभागून देण्यात आले. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रुपये ११११ रूपये तुकाई ग्रुप निघोज यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक, ज्ञानोदय कोचिंग लास निघोज, संतोष बोडखे यवतमाळ, ईरा इंटरनॅशनल जवळा, परि राजेश शिशुपाल, राजेश व्यवहारे नगर, घनश्याम सोनवणे मुंबई यांना देण्यात आले. तसेच संघांना बबनराव ससाणे व मारुती वराळ यांच्या वतीने मंळगंगा देवीचा फोटो देण्यात आला. सरपंच चित्रा वराळ, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद, मुंबई बँकेचे अधिकारी सुनील पवार, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, माजी सरपंच ठकाराम लंके, अनंतराव वरखडे, दिपक आण्णा लंके, जितेश सरडे, उपसरपंच माऊली वरखडे, ग्रामपंचायत माजी सदस्या आशा वरखडे, कलाप्रेमी मंडळाचे अध्यक्ष भगवान लामखडे, कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, उपकार्याध्यक्ष व माजी उपसरपंच उमेश सोनवणे, खजिनदार राजेंद्र उनवणे, अध्यक्ष रवि रणसिंग, सचिव रोहित पठारे, महेश ठाणगे, माउली तनपुरे, पत्रकार भास्कर कवाद, सागर आतकर, आनंदा भुकन, जयसिंग हरेल, ड. बाळासाहेब लामखडे, शिवाजीराव वराळ, बाळासाहेब लंके, बबनराव ससाणे, संपतराव वरखडे, शांताराम लाळगे, बबनराव सोनवणे, सुचिता ढवळे, तनिषा बोंबले, शंकरराव लामखडे, संतोष लाळगे, सागर लंके, राजू लाळगे, दिनेश लाळगे, भास्करराव वराळ, गजानन ठुबे, मोहन मंदिलकर, अनुराधा वराळ - एरंडे, गणेश भुकन, सुमन कवाद, आराध्या पवार आदी ग्रामस्थ व कलाप्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे व मुंबई बँकेचे अधिकारी सुनील पवार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नाट्य किरण कलामंच निघोज, मंळगंगा युवा साईधाम गणेश मंडळ, आपला गणपती गणेश मित्र मंडळ, सर्व कलाप्रेमी समस्त ग्रामस्थ निघोज, पारनेर तालुका पत्रकार संघ, नगर सह्याद्री परिवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
COMMENTS