मुंबई । नगर सह्याद्री - राज्यभरात सेवा देणाऱ्या रॅपिडो बाइक टॅक्सी कंपनीला हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. रॅपिडो कंपनीला आज दुपारी 1 वाजेप...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यभरात सेवा देणाऱ्या रॅपिडो बाइक टॅक्सी कंपनीला हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. रॅपिडो कंपनीला आज दुपारी 1 वाजेपासून बाइक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
राज्यभरातील विविध शहरांत रॅपिडो कंपनीद्वारे बाइक टॅक्सी सेवा दिली जाते. परंतु ही सेवा बेकायदेशीर असून, अशी सेवा देण्याचे धोरण राज्यात नाही. असे न्यायालयात परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. यामुळे रॅपिडो कंपनी पुन्हा उच्च न्यायालयात गेली होती. तेव्हा राज्य सरकारने 8 दिवसांत आपली भूमिका मांडून धोरण स्पष्ट करण्याचे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यावर आज सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने रॅपिडो कंपनीला त्यांच्या सर्व सेवा आज दुपारी 1 वाजेपासून बंद करण्याचे आदेश दिले आहे.
मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस प्रा.लि. यांनी अॅग्रिगेटर लायसन्स मिळण्याकरता केलेल्या अर्जाचा फेरविचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबर रोजी दिलेले होते. मात्र, दुचाकी व तिनचाकी टॅक्सी करता अॅग्रिगेटर लायसन्सचा फेरअर्ज पुणे आरटीओने नाकारला होता. त्यानंतर कंपनीने पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे. सरकारच्या वतीने परिवहन विभागाने त्यांचे म्हणणे उच्च न्यायालयात मांडले होते. कोर्टाच्या या निर्णयामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारचे बाईक टॅक्सीचे धोरण अस्तित्वात नाही. त्यामुळे ही वाहतूक अवैध प्रकारात मोडते, असा युक्तिवाद परिवहन विभागाने केला होता. त्यावर सार्वजनिक वाहतुकीबाबत बाईक टॅक्सी अॅग्रिगेटर परवान्यासंदर्भात केंद्राने धोरण बनवलेले आहे. हे धोरण राज्यांना लागू आहे. असा युक्तिवाद रॅपिडोच्या वकिलांनी केला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हजारो रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
COMMENTS