गणेश जयंतीनिमित्त नवीपेठेत जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे विविध उपक्रम अहमदनगर | नगर सह्याद्री गणपती हे सर्वांचे लाडके आराध्य दैवत आहे. स...
गणेश जयंतीनिमित्त नवीपेठेत जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे विविध उपक्रम
गणपती हे सर्वांचे लाडके आराध्य दैवत आहे. सुखकर्ता दुखहर्ता असलेला गणराय संपूर्ण जगाचा तारणहार आहे. नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळ दरवर्षी गणेश जयंती अतिशय धार्मिक वातावरणात साजरा करते. गणेश भक्त असलेले सदस्य धार्मिक, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. यंदा गणेश जयंती निमित्त मंडळाने शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांसाठी मेडिकल किटचे वाटप केले. रस्ते अपघातात प्रथमोपचार महत्वाचे असतात. त्यादृष्टीने मंडळाने स्तुत्य उपक्रम राबविला असून इतरांनीही याचे अनुकरण करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सावन पाटील यांनी केले.
गणेश जयंतीनिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळाने नवीपेठ येथे मंडळाच्या चांदीच्या गणेश मूर्तीची विधीवत पूजा करून भाविकांना शाबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप केले. तसेच यावेळी शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांसाठी मेडिकल किट देण्यात आले. या मेडिकल किट साठी चंगेडिया मेडिकलचे निलेश व योगेश चंगेडिया यांनी सहकार्य केले. गणेश पूजन व आरती विधी नितीन मुनोत व योगेश मुनोत यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष संतोष कासवा, कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूलचे राहुल सावदेकर, बाबालाल गांधी, गांधी कुरियरचे संतोष गांधी, महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या मुथा, सेक्रेटरी सुरेखा बोरा आदी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले की, आताच्या काळात रस्ते अपघात वाढले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना दक्षता गरजेची असते. नवीपेठ येथील बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशालेत अनेक विद्यार्थी रिक्षा, स्कूल व्हॅनने शाळेत येतात. त्यांच्यासाठी प्रथमोपचार साहित्य असलेली मेडिकल किट वाहनचालकांना देण्यात आली आहे. गणेश जयंती निमित्त हा उपक्रम राबविताना विशेष आनंद होत आहे.
राहुल सावदेकर म्हणाले की, कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून वाहन चालवताना शिकवताना आम्ही नेहमीच सुरक्षेला प्राधान्य देतो व वाहनचाकांचे प्रबोधन करतो. जय आनंद महावीर युवक मंडळही अशा प्रबोधनात अग्रेसर असते. त्यामुळेच आज स्कूल व्हॅनसाठी मेडिकल किटचे वाटप केले आहे. शेवटी आनंद मुथा यांनी आभार मानले. खिचडी महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
COMMENTS