माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व या विभागाअंतर्गत मिळाला प्रथम पुरस्काराचा सन्मान शिरुर / नगर सह्याद्री - पत्रकारिता क्षेत्रात मानाचा...
माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व या विभागाअंतर्गत मिळाला प्रथम पुरस्काराचा सन्मान
शिरुर / नगर सह्याद्री -
पत्रकारिता क्षेत्रात मानाचा समजला जाणारा, माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व या अंतर्गत देण्यात येणारा राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार -2022, साप्ताहिक संवाद वाहिनी व संवाद लाईव्ह टीव्हीचे मुख्य संचालक / संपादक मदन काळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते काल 6 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला आहे. काळे यांना पुणे विभागातून हा प्रथम पुरस्कार जाहीर प्राप्त झाला आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, समृध्दी प्रकल्पाचे प्रशासकीय शिल्पकार राधेश्याम मोपलवार (उपाध्यक्ष व एम.डी.एम.एस.आर.डी.सी.), मनरेगाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष अजय आशर, मुंबई मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, प्रसिध्द सिनेअभिनेते व निर्माते मंगेश देसाई, सोलापूर येथील प्रसिध्द साखर कारखाना मालक अभिजीत पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मदन काळे व न्युज 18 लोकमतचे प्रसिध्द ॲंकर विलास बढे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.
मदन काळे गेल्या 32 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांना राज्यभरातून ओळखले जाते. 1990 साली मासिक कॉलेज कट्टा, मासिक फुलबाग आणि मासिक चौफर पासून सुरु झालेला त्यांच्या पत्रकारीतेचा प्रवास दैनिक लोकसत्ता, दै.लोकमत,सामना,पुढारी, तरुण भारत, देशोन्नती, देशदूत असा बहरत गेला आहे. अशा विविध दैनिकात त्यांनी पत्रकार म्हणून तर दै.लोकसत्ता या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणूनही आपली कारकिर्द भूषविली आहे. 1998 मध्ये देवकृपा पब्लिकेन प्रा.लि.मुंबईच्या वतीने प्रसिध्द होणाऱ्या रसिक परिवार या मासिकाचे मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी आपली कारकिर्द गाजविली आहे. याचं काळात त्यांनी राज्यातील अनेक महत्वाचे प्रश्न समाजासमोर ठेवले आणि त्याचा पाठपुरावाही केला. त्या काळी त्यांनी उपस्थित केलेले अनेक महत्वाचे प्रश्न विधानसभेतही गाजले आहेत. युतीचे सरकार असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दत्ता राणे, तत्कालीन माहिती व परिवहन मंत्री गजानन किर्तीकर, तत्कालीन सनदी अधिकारी अरुण भाटीया, तत्कालीन पर्यटन मंत्री अर्जुन खोतकर यांनी मदन काळे यांच्या लेखनीचे विशेष कौतुक केले होते. मदन काळे यांनी आजपर्यंत कित्येक मंत्री, शेकडोच्या वर अभिनेते यांच्या सडेतोड मुलाखती घेतल्या आहेत. कॉलेज कट्टा,मासिक चौफेर, मासिक फुलबाग,सत्याग्रही, लोकसत्ता,लोकमत यामधुनही विपुल प्रमाणात विविध विषयावर लेखन केले आहे. 1999 साली मदन काळे यांनी साप्ताहिक संवाद वाहिनीची मूहूर्तमेढ रोवली आणि परदेशात लोकप्रिय असणारी मोफत वृत्तपत्र वितरणाची पहिली संकल्पना 23 वर्षांपूर्वी शिरुर तालुका, सिंहगड परिसर (पुणे), पिंपरी-चिंचवड, धनकवडी (पुणे) या भागातून भारतात पहिल्यांदा राबविली आणि पत्रकारीता क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. एकुणच एक निर्भीड पत्रकार व अभ्यासू लेखक म्हणून सर्वांना काळे यांचा परिचय आहे. स्थानिक बातम्यांना प्राधान्य देताना त्यांनी आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण विषयांना हात घालून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. निवडणुकांचे अचूक अंदाज आणि राजकीय परिस्थितीची परफेक्ट मांडणी करण्यात ते माहिर आहेत. राज्यभरातून फक्त एकाच दिवसांत स्वतंत्र विशेषांक प्रसिध्द क़रुन देण्याचे एक वेगळे रेकॉर्डही त्यांनी साध्य केले आहे. सध्या प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया, डिजिटल मिडीया, प्रॉडक्शन हाऊ स, सॉफ्टवेअर्स अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी असलेल्या ग्रामीण भारतातील पहिल्या अद्ययावत मिडीया आणि प्रॉडक्शन हाऊ सची ते उभारणी करीत आहेत, माध्यम क्षेत्रातला हा जगातील पहिला प्रयोग असणार आहे, त्यामुळे माध्यम क्षेत्रात या प्रोजेक्टची सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या या प्रोजेक्टससाठीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 2023 मध्ये हा संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. त्यामुळे अशा या सर्वगुणसंपन्न,अभ्यासू व माणूसकीप्रधान व्यक्तीमत्वाचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव होत असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. या पुरस्कार समारंभ प्रसंगी प्रसिध्द होणाऱ्या खास पुस्तकात पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके आणि जगप्रसिध्द उद्योजक प्रकाशशेठ धारीवाल यांनीही मदन काळे यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.
मदन काळे यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार
- 1993 साली विपुल प्रकाशच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
- 2003 मध्ये साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात येणारा राज्यस्तरीय लक्षवेधी शब्दगंध साहित्यिक पुरस्कार
-2005 मध्ये ह्युमन राईटस् असोसिएशनचा जनकल्याण मानवता सेवा पुरस्कार,
- 2008 साली पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकारिता सन्मानीत पुरस्कार
- 2010 मध्ये मी विजेता होणारचं ! हा विशेष सन्मान पुरस्कारही मुंबईत तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान
- 2017 मध्ये शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार
- 2018 शिरुर शहर मुस्लीम जमाअतच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
मदन काळे यांनी लिहीलेली आणि 1998 ते 2000 या कालावधीत प्रचंड गाजलेली लोकप्रिय पुस्तके
- शिरुर दर्शन (शिरुर तालुक्याचा ऐतिहसिक ठेवा असलेला संदर्भग्रंथ)
- मी अनुभवलेला माणूस
- सखी (खास कॉलेज तरुणांसाठी धमाल पुस्तक)
- गंमत गांवची धमाल कथा (कथासंग्रह)
- धमाल गांणी गंमतीची (बालगीतसंग्रह)
COMMENTS