अध्यक्षा शालिनी घुले, राजेंद्र चौधरी यांची माहिती । आमदार लंके व राणीताई लंके यांच्या हस्ते महापूजा पारनेर । नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्...
अध्यक्षा शालिनी घुले, राजेंद्र चौधरी यांची माहिती । आमदार लंके व राणीताई लंके यांच्या हस्ते महापूजा
पारनेर । नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगांवरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा तीन दिवशीय वार्षिक यात्रोत्सव 6 जानेवारीपासून प्रारंभ होणार असून आमदार नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या हस्ते महापुजा होणार आहे.
या राज्यस्तरीय ‘ब’वर्ग तिथेक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान होणार असल्याची माहिती अध्यक्षा शालिनी अशोक घुले, यात्रा कमिटी अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष महेश शिरोळे व सचिव जालिंदर खोसे यांनी दिली आहे. 3 दिवसांच्या यात्रेला 6 लाखांवर यात्रेकरु कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन व तळीभंडार करून खोबरे भांडारा उधळुनसदा आनंदाचा येळकोट’,येळकोट येळकोट जय मल्हार”या जयघोषाने कोरठणगड दुमदुमत राहील.
दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतरच सन 2023 या नववर्षातील जिल्ह्यातील ही पहिली मोठी यात्रा असुन धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या भक्तीमय मांदीयाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणुन या यात्रेचे महत्व आहे.
शुक्रवार दि 6 जानेवारी पौष पौर्णिमेला पहाटे 4 वा श्री. खंडोबा देवाला मंगलस्नान पुजा, चांदिच्या सिंहासनाचे व चांदिच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल नंतर सकाळी 6 वा अभिषेक, महापुजा,महाआरती होऊन भाविकांना यात्रेतील दर्शनासाठी मंदिरे खुले होईल. दिवसभर तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायंकाळी 4 वा.श्री. कोरठण खंडोबा पालखी पिंपळगांवरोठा गावात मुक्कामी जाईल. रात्री गांवात पालखी छबीना मिरवणूक होईल.
शनिवार दि 7 जानेवारी रोजी स.5 वा. पासुन देवदर्शन सुरु होईल, नंतर श्री खंडोबा पालखीचे स 8वाजता नवीन शाही रथातून पिंपळगांवरोठा गांवातुन प्रस्थान होऊन श्री खंडोबा मंदिराकडे पालखी सोहळा आगमनीत होईल. दिवसभर भाविकांचे तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायं.4 वा. सावरगांव घुले ता.संगमनेर येथून आलेल्या श्री खंडोबा मानाची पालखीची मिरवणुक व देवदर्शन कार्यक्रम मंदिराजवळ होईल. रात्री 9 वा. पर्यंत मंदिराजवळ श्री कोरठण खंडोबा देवाचा पालखी छबीना मिरवणूक होईल.
रविवार दि 8 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.सकाळी 8 वा. श्री खंडोबा चांदिची पालखी आणि अळकुटी बेल्हे, कांदळी वडगांव माळवाडी (ता.जुन्नर), सावरगांव घुले (ता. संगमनेर) कासारे,कळस येथुन आलेल्या पालख्यांची भव्य मिरवणुक (छबीना)निघेल दुपारी 12 वा. छबीना मंदिराच्या पायर्यांवर येऊन पालख्याच्या मिरवणुकीची सांगता होईल.हा मिरवणुक सोहळा भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा असतो.
शनिवारी बैलगाड्यांसाठी देवदर्शन ः माजी सरपंच अशोक घुले
या वार्षिक यात्रोत्सवा दरम्यान आठ डिसेंबर रोजी बैलगाड्यांसाठी देवदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 10 वाजता या घाटाचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. तर या दरम्यान पिंपरी पेंढार येथील गायमुख वाडी रहिवासी कै. विठोबा भाऊ शेलार व कै. एकनाथ विठोबा शेलार यांच्या मानाच्या बैलगाडाने या देवदर्शनास सुरुवात होणार असल्याची माहिती माजी सरपंच अशोक घुले यांनी दिली आहे.
--
COMMENTS