अहमदनगर | नगर सह्याद्री दोघांनी तरूणाला मारहाण करून बेशुध्द केले. गणेश अर्जुन कोटकर (वय ४१ रा. व्यंकटेश सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रोड) असे...
दोघांनी तरूणाला मारहाण करून बेशुध्द केले. गणेश अर्जुन कोटकर (वय ४१ रा. व्यंकटेश सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रोड) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोटकर यांच्या फिर्यादीवरून अफरोज शेख (रा. कल्याण रोड) व त्याचा नातेवाईक (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता गणेश कोटकर घरी होते. त्यांचा भाऊ संतोष कोटकर एमआयडीसी येथे कामावर गेले होते. दरम्यान शेख व एक अनोळखी यांनी घरात घुसून भावजाईला मारहाण करण्यास सुरूवात केली असता गणेश तेथे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यांना शेख व अनोळखी व्यक्तीने मारहाण करून जखमी केले. जखमी गणेश यांना उपचारासाठी त्यांच्या भावाने एका खासगी रूणालयात दाखल केले. उपचारादरम्यान कोटकर यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS