नाशिक पदवीधर निवडणूक; तांबे यांना टीडीएफ, शिक्षक संघटना, राजकीय पक्षांचा पाठिंबा

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरलेल्या सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध शिक्षक स...



नाशिक / नगर सह्याद्री -

नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरलेल्या सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध शिक्षक संघटना आणि राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. डॉ.सुधीर तांबे यांनी शिक्षक, पदवीधर, सामान्य नागरीक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. अडीअडचणीच्या वेळी डॉ.सुधीर तांबे यांनी केलेली मदत लोकं आजही विसरलेले नाहीयेत. यामुळे या सगळ्यांनी आता डॉ.सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजीत तांबे यांची स्वत:ची कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे, त्याच्या जोडीला त्यांना त्यांच्या वडिलांच्या पाठिशी उभ्या असलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि पाठिराख्यांची मदत होणार आहे.

 महाराष्ट्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, चाँद सुलताना अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रिपाइं (गवई गट), स्वाभिमानी शिक्षक संघटना (अहमदनगर जिल्हा), सैनिक कल्याण समिती, संगमनेर, अॅग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गनिझम मॅन्युफॅक्चरर्स अँड फार्मर्स असोसिएशन या संघटनांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला आहे. 


सत्यजीत तांबे हेच या निवडणुकीमध्ये विजयी होणार हा विश्वास असलेल्या चाँद सुलताना अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या शिक्षण संकुलाच्या कॅम्पससाठी निधीची गरज असून निधी मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी गरजेचा असलेला निधी आपण व्यक्तिश: लक्ष घालावे.  आमची मागणी ही तुमच्याच हस्ते पूर्ण व्हावी असेही या शिक्षणसंस्थेने म्हटले आहे. महाराष्ट्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, तांबे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले कार्य आणि सहकार्य याची महासंघाला जाणीव असल्याने आम्ही सत्यजीत तांबे यांना सक्रीय पाठिंबा देत आहोत. राज्यातील शालेय स्तरावर क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांवर होणारा अन्याय सत्यजीत तांबे यांच्या सहकार्याने दूर होईल असा विश्वास या संघटनेने व्यक्त केला आहे. 


स्वाभिमानी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे. सैनिक कल्याण समिती, संगमनेर यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, उच्चशिक्षित, सहृदयी, पित्याचा वारसा आपल्याकडे असल्याने आपण या पदासाठी योग्य उमेदवार आहात असे म्हटले आहे. अॅग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गनिझम मॅन्युफॅक्चरर्स अँड फार्मर्स असोसिएशनने म्हटलंय की, कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण आणि धडाडीचे नेतृत्व लाभणार असल्याने आमच्या संघटनेचे सगळे पदवीधर आपल्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. रिपाइं (गवई गट) ने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देत असताना अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार या 5 जिल्ह्यांसह 54 तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रचार यंत्रणेत सामील करून घेण्याची विनंती केली आहे. 


यापूर्वी सत्यजीत तांबे यांना  महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजीत तांबे यांना दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकवावे असे आवाहन मस्ट या संघटनेने केले आहे. 


महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पदवीधरांना सत्यजीत तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी मनिष गावंडे, महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून सत्यजीत तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी आणि हितचिंतक शिक्षक हे सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील असे आश्वासनही गावंडे यांनी दिले आहे.


टीडीएफ चा जाहीर पाठिंबा; सत्यजित तांबे टिडीएफ पुरस्कृत उमेदवार

 पदवीधर, बेरोजगार ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर ,वकील यांसह विविध आस्थापनांमध्ये काम करणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्याच कार्यकर्तुत्वाचा वारसा जपणारे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने अधिकृत जाहिर पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ ) च्या राज्यकार्यकारणाची बैठक महाराष्ट्र हायस्कूल पुणे येथे राज्य अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेत झाली यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते , कार्यावाह हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी के थोरात (पुणे) विभाग कोकण विभागाचे नरसू पाटील , नानासाहेब पुंडे (मुंबई) पुणे विभागाचे सचिव के एस ढोमसे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पवार ,सहसचिव डॉ. एन डी नांद्रे, खजिनदार संदीप घोरपडे, जळगावचे आर्. एच बाविस्कर, अहमदनगरचे आबासाहेब कोकाटे ,नाशिकचे रवींद्र मोरे, अशोक नवल ,राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे ,सुधीर काळे (नगर) नरेंद्र पाटील (नंदुरबार) कुशारे (नाशिक) दत्ता आरोटे, दशरथ मांडे, सुरेश झावरे, अरविंद कडलग, जिजाबा हासे (संगमनेर) आदींसह  राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना टीडीएफ तर्फे उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आले.

  यावेळी अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले की, टिडीएफ संघटनेच्या पाठिंबावर मागील तीन वेळा आमदार डॉ. तांबे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे . सर्व पदवीधर व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवताना त्यांनी मागील बारा वर्षात शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. याचबरोबर सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी ,पदवीधर या सर्व मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे .शिक्षक आणि पदवीधर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. याचबरोबर अहमदनगर ,धुळे ,जळगाव, नंदुरबार ,नाशिक जिल्ह्यातील सर्व टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहेत.आमदार डॉ.सुधीर तांबे व त्यांचा परिवार हा पुरोगामी विचार जपणारा असून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना टीडीएफ पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. हिरालाल पगडाल म्हणाले की, लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा ,धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी पीडीएफने सातत्याने काम केले असून सत्यजित तांबे याच विचारांनी राज्यभर काम करत आहेत. म्हणून आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघ च्या निवडणुकीत राज्यातील टिडीएफ एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे.


यावेळी टीडीएफ चे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, संजय पवार, नानासाहेब पुंडे, आर एच बाविस्कर डॉ. एन.डी. नांद्रे  आदींनी मनोगते व्यक्त केली


सत्यजित तांबे यांना टीडीएफने दिलेल्या पाठिंब्याचे धुळे, जळगाव ,नंदुरबार ,नाशिक, अहमदनगर मधील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे

COMMENTS

Name

Accident,38,Ahmednagar,7291,Akole,20,braking,47,Breaking,5148,Business,7,corona,567,Crime,1457,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1354,Epaper,29,Health,403,indan,8,India,1240,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4938,manoranjan,14,Mumbai,231,Nagar,291,Newasa,65,Parner,3048,Parner Ahmednagar,57,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1296,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,157,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,137,Shrirampur,9,Sport,272,sports,43,weather,32,World,132,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: नाशिक पदवीधर निवडणूक; तांबे यांना टीडीएफ, शिक्षक संघटना, राजकीय पक्षांचा पाठिंबा
नाशिक पदवीधर निवडणूक; तांबे यांना टीडीएफ, शिक्षक संघटना, राजकीय पक्षांचा पाठिंबा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiS6vkyuGLh-8kTFpdFuPiYGtkmljtNjvWXX-dbRBnHA0e0QOuRsAtwTP60ItrZpjXXaO2gN65S_Rhtu_CPorGNgXO43xdnjOxjYbIkRy1GlqBDv4tFlpQni7pDV2N2Mbdem6VVw6ekWSx-dpGFoo1MUQjijtDf5o7MgQy5yqb6ch0FXz4CYGaVjFEY/w640-h360/satyajeet.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiS6vkyuGLh-8kTFpdFuPiYGtkmljtNjvWXX-dbRBnHA0e0QOuRsAtwTP60ItrZpjXXaO2gN65S_Rhtu_CPorGNgXO43xdnjOxjYbIkRy1GlqBDv4tFlpQni7pDV2N2Mbdem6VVw6ekWSx-dpGFoo1MUQjijtDf5o7MgQy5yqb6ch0FXz4CYGaVjFEY/s72-w640-c-h360/satyajeet.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/01/Nashik-padvidhar-nivadnuk-satyajit-tambe-shikshak.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/01/Nashik-padvidhar-nivadnuk-satyajit-tambe-shikshak.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content