उपसभापती मीनाताई चोपडा यांच्या प्रयत्नातून माणिक नगर परिसरात डांबरीकरण अहमदनगर । नगर सह्याद्री विकासाची कुठलीही कामे करीत असताना नियोजनबद्ध...
अहमदनगर । नगर सह्याद्री
विकासाची कुठलीही कामे करीत असताना नियोजनबद्ध केल्यास ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. त्यामुळे ती कामे कायमस्वरूपी राहतात. त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये विकास कामे सुरू आहेत. आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाला मोठा निधी प्राप्त झाला आहे. वर्षभरामध्ये प्रभागातील सर्व विकास कामे मार्गी लागून शहरातील एक विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाईल. आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासाची कामे महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लावत आहोत असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले की, प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वच भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने ही सर्व विकासाची कामे मार्गी लागत आहेत. माणिक नगर परिसरातील रस्ता अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. या रस्ता डांबरीकरण कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे.
आता या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. विकासाची कामे करत असताना नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असते. उड्डाणपुलाच्या कामामुळे माणिक नगर परिसरातील नागरिकांनी वाहतुकीच्या समस्येला तोंड दिले आहे. खर्या अर्थाने विकास कामांमध्ये नागरिकांचे मोठे सहकार्य लाभत आहे जमिनी अंतर्गातील सर्व विकास कामे मार्गी लावली असल्यामुळे रस्त्याची कामे हाती घेतली आहेत असे ते म्हणाले.
मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा यांच्या प्रयत्नातून माणिक नगर येथे रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, आर.एस. बोरा, श्रेणिक शिगवी, राजेश चंगेडीया, धनराज गांधी, अरविंद गुंदेचा, अनिल दुग्गड, राजाभाऊ गांधी, सुनिल बाफना, संतोष डुंगरवाल, अजित गांधी, इंजि. धनेश गांधी, सुधीर मुथा, प्रितम गुंदेचा, सोनु भोसले आदी उपस्थित होते.
COMMENTS