तांबे म्हणाले 'त्या' बातम्या खोडसळ, आमचं ठरलं...; काँग्रेसने केला 'हा' दावा

काँग्रेसचाच उमेदवार पदवीधर मतदारसंघात चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होईल अहमदनगर / नगर सह्याद्री -  नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा ...



काँग्रेसचाच उमेदवार पदवीधर मतदारसंघात चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होईल

अहमदनगर / नगर सह्याद्री - 

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघात सलग तीन वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचाच उमेदवार चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोडसळ असून जाणीवपूर्वक भाजपकडूनच या बातम्या पेरल्या जात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 



काळे म्हणाले की, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते काम करतात. सत्यजित तांबे यांना एनएसयुआय तसेच युवक काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी संधी दिली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेला दोन वेळा ते सदस्य राहिले आहेत. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. पक्ष त्यांना वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी देत आला आहे आणि भविष्यात देखील देत राहील. आ. थोरात आणि काँग्रेस पक्षाने त्यांना आजवर भरभरून दिले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सत्यजीत तांबे म्हणाले, आमचं ठरलं...

राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी देण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. या चर्चेस आज सत्यजीत तांबे यांनी स्वत:हून पुर्णविराम देत काेण काय म्हणते यापेक्षा मी काॅंग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे हे सर्वांना माहित असल्याचे म्हटले आहे. युवा नेते सत्यजित तांबे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले भाजपाकडून ऑफर असल्याची सर्व चर्चा निराधार आहे. मी भाजपात प्रवेश करणार असल्याची आवाई उठवली गेली आहे. मी माझ्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि राहणार.

डॉ.सुधीर तांबे हे तीन टर्म काँग्रेसच्या वतीने आमदार आहेत. त्यांनी चांगले काम केले आहे. दुर्गाताई तांबे देखील सक्षमपणे यशस्वी नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आ.थोरात यांच्या नेतृत्वाखाली तांबे परिवाराने सहकारामध्ये देखील काम केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे नाराज असल्याच्या खोट्या बातम्या भाजपकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. आ.थोरात, तांबे हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील निष्ठावान कुटुंब आहेत. पक्ष अडचणीच्या काळात असताना आ.थोरात यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे करण्याचे काम केले असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 


भाजपा आयारामांचाच पक्ष 

भाजपमध्ये मूळ भाजपवासीयांना अजिबात महत्त्व नाही. केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून लोकांना आयात करण्याचे काम केले जाते. त्यांना आयते नेतृत्व हवे असते. मात्र आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस भक्कम आणि अभेद्य आहे, असे काळे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे. 


काँग्रेसकडून तांबेंची उमेदवारी जाहीर

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच या मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  बुधवार (दि. 11) डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केलेली आहे. गुरुवारी (दि. 12) डॉ. तांबे हे आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे नेते व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याचे निश्चितही झाले आहे.

 

COMMENTS

Name

Accident,38,Ahmednagar,7291,Akole,20,braking,47,Breaking,5148,Business,7,corona,567,Crime,1457,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1354,Epaper,29,Health,403,indan,8,India,1240,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4938,manoranjan,14,Mumbai,231,Nagar,291,Newasa,65,Parner,3048,Parner Ahmednagar,57,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1296,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,157,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,137,Shrirampur,9,Sport,272,sports,43,weather,32,World,132,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: तांबे म्हणाले 'त्या' बातम्या खोडसळ, आमचं ठरलं...; काँग्रेसने केला 'हा' दावा
तांबे म्हणाले 'त्या' बातम्या खोडसळ, आमचं ठरलं...; काँग्रेसने केला 'हा' दावा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnpRd3JXk92go3KFdAjaW7QiROqINLBZoN6rpv79oELNdVLuPLFZU8udbIMz5pRCDnLhq13cM2cYAm94UBfsL9AaKixBksF8VqdA53CT5NN_0z3Evh8Z1uakVGMNsuBWuK-0Zz56WXq_ubdMNuHxGLz3AvWTJt0kxMjEXguO6SN3rmU6X8RB8tIZbK/w640-h640/MMM.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnpRd3JXk92go3KFdAjaW7QiROqINLBZoN6rpv79oELNdVLuPLFZU8udbIMz5pRCDnLhq13cM2cYAm94UBfsL9AaKixBksF8VqdA53CT5NN_0z3Evh8Z1uakVGMNsuBWuK-0Zz56WXq_ubdMNuHxGLz3AvWTJt0kxMjEXguO6SN3rmU6X8RB8tIZbK/s72-w640-c-h640/MMM.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/01/NASHIK-PADVIDHAR-MATDAR-SANGHA-TAMBE-BJP-.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/01/NASHIK-PADVIDHAR-MATDAR-SANGHA-TAMBE-BJP-.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content