मुंबई । नगर सह्याद्री - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन क...
मुंबई । नगर सह्याद्री -
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन केल्यानंतर छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना खा. सुळे यांच्या साडीने पेट घेतला आहे. साडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत आग विझवण्यात आली आहे. सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांचे दैनंदिन कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम संपवून त्या बावधनमधील कार्यक्रमालाही गेल्या आहे.
COMMENTS