लातूर / नगर सहयाद्री- शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूर शहरात, शिक्षकाने कॉपी गर्ल म्हणत भर वर्गात अपमान केल्याने एका शाळकरी अल्पवयीन मुलीने आ...
शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूर शहरात, शिक्षकाने कॉपी गर्ल म्हणत भर वर्गात अपमान केल्याने एका शाळकरी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी सामोरे अली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शाळकरी मुलीने एक सुसाईड नोटही लिहिली आहे.
एका वृत्तसंस्थाच्या माहितीनुसर, लातूर शहरातील औसा रोडवर असणाऱ्या एका शाळेत ही विद्यार्थिनी नववीच्या वर्गात शिकत होती. सध्या सीबीएससीच्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान १७ जानेवारीला ही विद्यार्थिनी परीक्षा देत असताना कॉपी करताना पकडली गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी तिचा भर वर्गात कॉपी गर्ल म्हणून उल्लेख केला.
त्यामुळे या विद्यार्थिनीच्या मनामध्ये अपराधीपणाची आणि त्यासोबतच अपमानाची भावना निर्माण झाली. ही अपमानकारक भावना मनात घेऊन तिने सुसाईड नोट लिहीत जगाचा निरोप घेतला. तिने १८ जानेवारी रोजी सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
COMMENTS