कान्हूर पठार | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार पतसंस्थेस सहकार क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रथम सहकार गौरव सर्वोत्कृष्ट ...
पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार पतसंस्थेस सहकार क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रथम सहकार गौरव सर्वोत्कृष्ट संस्था २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन सुशीला ठुबे यांनी दिली.
शिर्डी येथे झालेल्या दोन दिवसीय सहकार गौरव सोहळा २०२२ कार्यक्रमामध्ये कान्हूरपठार को. ऑप क्रेडिट सोसा. मर्या. पतसंस्थेस बँकिंग व सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा सर्वोत्कृष्ठ संस्था पुरस्कार २०२२ रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतिष मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे यांच्या हस्ते चेअरमन सुशीला ठुबे, व्हा.चेअरमन पी.के ठुबे, कार्यकारी संचालक नमिता ठुबे, संचालक दादाभाऊ नवले,संपत खरमाळे यांनी पुरस्कार स्विकारला.
या संस्थेने ग्राहकांना मुख्य कार्यालयासह पुणे नगर जिल्ह्यात १७ शाखांच्या माध्यमातून कोअर बँकिंग सुविधा, एटीएम, आरटीजीएस, एनईएफटी, एस एम एस व मोबाईल अँँप सुविधा उपलब्ध करून दिल्याने संस्थेविषयीची विश्वासहर्ता वाढण्यास या सेवांमुळे मदत होऊन संस्थेंच्या व्यवसायामध्ये वाढ होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या ठेवी ४६५ कोटी, कर्ज ३४३ कोटी, गुंतवणूक २०० कोटी, खेळते भागभांडवल ५८४ कोटी रुपये आहेत. तसेच १२ शाखा या स्व मालकीच्या आहेत.
COMMENTS