सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील अस्तगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आल...
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील अस्तगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शाळेतील विद्यार्थीनी ऋतुजा काळे, सुनिल खोसे, प्रियंका सुधीर काळे, आदिती अनिल काळे यांनी राजमाता जिजाऊंविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भिवसेन पवार व सहशिक्षक विमल जाधव, धोंडीभाऊ नांदखिले, राजेंद्र पायमोडे, शारदा ठाणगे, आशा धाडगे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनमोल काळे, उपाध्यक्ष राजेंद्र गाढवे, कचरू काळे, मंगल काळे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS