संजय गांधी निराधार लाभार्थ्यांकडून अनुदान खात्यावरून न काढल्याने २, ७६, २७ हजार सरकार जमा: तहसीलदार शिवकुमार आवळकंठे पारनेर | नगर सह्याद्री...
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांकडून अनुदान खात्यावरून न काढल्याने २, ७६, २७ हजार सरकार जमा: तहसीलदार शिवकुमार आवळकंठे
पारनेर | नगर सह्याद्री
सरकारच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सरकारकडून निराधार, दिव्यांग, शारीरीक आजाराने रोगग्रस्त, निराधार परितक्त्या देवदाशी या सर्व दुर्बल घटकांसाठी सरकार अनुदान देते. मात्र ते अनुदान संबधीत लाभार्थीने तीन महिने न घेतल्याने लाभार्थीच्या बँक खात्यावरून पुन्हा तहसीलकडे वर्ग करण्याबाबतचे आदेश तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी काढले होते. त्यापोटी पारनेर तहसीलदार यांनी सुमारे २ कोटी ७६ लाख २७हजार ३३५ रूपये सरकारी तिजोरीत जमा केले आहेत. अशी रक्कम पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी.
याबाबत माहिती अशी की, सरकारच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सरकारकडून निराधार, दिव्यांग, शारीरीक आजाराने रोगग्रस्त, निराधार परितक्त्या देवदाशी अशा घटकांना संजय गांधी निराधार अनुदान योजणा, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजणा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजणा व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती योजना या सर्व दुर्बल घटकांसाठी सरकार दरमहा अनुदान देत असते. संबधीत लाभार्थीने ते अनुदान सलग गेली तीन महिणे न उचलणे, लाभार्थी मयत असणे, लाभार्थीचे बँक खाते बंद असणे किंवा संबधीत लाभार्थी स्थालांतरीत झाला असेल अशा विविध कारणांनी तालुयातील अनेक लाभार्थींनी आपले सरकारी अनुदान घेतले नाही असे दिसून आले होते. त्यामुळे तहसीलदार आवळकंठे यांनी तालुयातील सर्व बँकाना या बाबत कळविले होते. व संबधीत लाभार्थींच्या नावे पडून असलेली रक्कम पुन्हा तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यास सांगीतली होते. संबधीत बँकांनी अशी सुमारे दोन कोटी ७६ लाख २७ हजार ३३५ रूपये रक्कम परत तहसीलदार यांचे कडे पाठविली होती.
सरकारी अनुदानाची रक्कम संबधीत लाभार्थींनी न घेतल्याने अता त्या रकमेचा पारनेरचे तहसीलदार आवळकंठे यांनी सरकारी तिजोरीत भरणा केला आहे. सरकारी विशेष सहाय्यता योजणेतील मिळणारी रक्कम लाभार्थींनी न घेतलेली एवढी मोठी रक्कम जिल्ह्यात प्रथमच पारनेर तालुयातीतून पुन्हा सरकारी तिजोरीत भरली गेली असावी.
अनुदानात अनियमितताशिक्षा मात्र लाभार्थ्यांना..
महसूल विभागाच्या वतीने पारनेर तालुयातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणार्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरील रक्कम तीन महिने पडून राहिल्याने ती सरकारी जमा केली आहे. या लाभार्थ्यांमध्ये अनेक निराधार विधवा परितक्त्या, अपंग लाभार्थ्यांचा समावेश असून अनेक वेळा ही अनुदान सबबतीत लाभार्थ्यांच्या खात्यावर उशिरा जमा होते. व कधीकधी दोन दोन तीन महिन्यांनी अनुदान जमा होते. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनेतील लाभार्थ्यांवर महसूल विभागाची कारवाई अन्यायकारक असून अनुदानात अनियमीतता महसूल विभागाची शिक्षा मात्र लाभार्थ्यांना अशी प्रतिक्रिया लाभार्थ्याकडून व्यक्त होऊ लागली आहे.
सामाजिक न्याय व विषेश सहाय्य मंत्रालयाच्या २० ऑगस्ट २०१९ च्या नियमानुसार मयत, खाते बंद, अथवा स्थलांतरी किंवा सलग तीन महिणे अनुदान उचलणे या नियमानुसार वरील रक्कम पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली आहे. अद्यापही अशा रकमेचा वसुल सुरू आहे.
-शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार, पारनेर
बँकनिहाय वसूल रक्कम (कंसात रक्कम रूपये)
दि अहमदनगर डिस्ट्रीट सेंट्रल बँक (२,६४,७७,९१२ ), बँक ऑफ महाराष्ट्र ( ४४,६०० ), बँक ऑफ बडोदा (६,६४,१०६), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (३,५७,२००), स्टेट बँक ऑफ इंडिया (८१, ५१७), आय.डी.बी.आय.पुणेवाडी (२०००) या प्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यावर असुन ही रक्कम शासन खात्यावर जमा होणार आहे.
COMMENTS