राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण अहमदनगर | नगर सह्याद्री युवकांच्या कर्तुत्वाच्या जोरावर भारत महासत्ते...
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण
अहमदनगर | नगर सह्याद्रीयुवकांच्या कर्तुत्वाच्या जोरावर भारत महासत्तेकडे झेप घेईल असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आ. संग्राम जगताप यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते समवेत पै.शिवाजी चव्हाण, पै. संतोष भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, संजय सपकाळ, अजय दिघे, संतोष लांडे, अमित खामकर,गणेश बोरुडे, वीरेंद्र सागर गुंजाळ, लहू कराळे, आनंद गारदे, मयूर भापकार आदी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम केले आहे. प्रत्येक मातेने जिजाऊंचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना घडवण्याचे काम करावे जिजाऊ ह्या दूरदृष्टी माता होत्या. स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण भारत देशात युवा दीन म्हणून साजरी केली जाते. भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जात आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असून युवकांच्या कर्तुत्वाच्या जोरावर महासत्तेकडे झेप घेत आहे. तरी युवकांनी महापुरुषांची गुण अंगीकारून आपापल्या क्षेत्रामध्ये काम उभे करावे. स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान व्यक्ती म्हणून संपूर्ण जगात त्यांची ओळख आहे. वेदांत आणि योग जनाचा या भारतीय तत्त्वज्ञानाचा पाश्चात्य जगाला परिचय करून देण्यात ते देण्यात ते प्रमुख व्यक्ती होते असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी केले.
COMMENTS