नवी दिल्ली । वृत्तसंस्था चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने भारत, पाकिस्तान आणि अमेरिका सारख्या देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका आहे. ओ...
नवी दिल्ली । वृत्तसंस्था
चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने भारत, पाकिस्तान आणि अमेरिका सारख्या देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका आहे. ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांच्या मतानुसार भारतात कोरोनाची चौथी लाट मार्चमध्ये येऊ शकते.
चीनच्या शांघायमधील 70% लोकांना संसर्ग झाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार शांघायमधील स्मशानभूमीत दररोज 5 पट अधिक मृतदेह मिळत आहेत. त्यामुळे कुटुंबियांना शोक व्यक्त करण्यासाठी केवळ 5 ते 10 मिनिटे मिळत आहेत. जगातील अनेक देशांनी चीनमधून येणार्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, यूके, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे. यावर चीन सरकारने आरोप केला आहे की हे देश आपल्या प्रवाशांना लक्ष्य करत आहेत.
चीनमधून आलेली एक कोरोना बाधित व्यक्ती दक्षिण कोरियामध्ये बेपत्ता झाली आहे. मुळात चीनमधून आल्यानंतर त्याच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्याला क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णाला सोलमधील हॉटेलमध्ये नेण्यात आले, तेथून तो गायब झाला. या रुग्णाचा वॉन्टेड यादीत समावेश करण्यात आला आहे. कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते किंवा 6.5 लाखांचा दंड भरावा लागू शकतो.
COMMENTS