मुंबई / नगर सहयाद्री- राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सरकारने हाती घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत एक मोठा...
मुंबई / नगर सहयाद्री-
राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सरकारने हाती घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत एक मोठा बदल शासनाने केला आहे. याआधी गट अ, ब, क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणाऱ्या १० लाख रुपयांच्या विमा रक्कमेत सरकारने दीडशे ते अडीचशे पटीने वाढ केली आहे.
एका वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळणार आहेत. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत.
अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत मिळणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ होणार आहे. सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे.गट 'अ' साठी ८८५, गट 'ब' साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट 'क' व 'ड' साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाणार आहे.
COMMENTS