अहमदनगर | नगर सह्याद्री पुणे येथील महाराष्ट्र जैन वार्ताच्या वतीने नगरचे उद्योजक मनोज छाजेड व मुकेश छाजेड यांचा लेजंडस ऑफ महाराष्ट्र पुरस्क...
पुणे येथील महाराष्ट्र जैन वार्ताच्या वतीने नगरचे उद्योजक मनोज छाजेड व मुकेश छाजेड यांचा लेजंडस ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते छाजेड बंधूंना गौरविण्यात आले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, अभय छाजेड, माजी आमदार राहुल मोटे, विजयकांत कोठारी, ताराचंद डुंगरवाल, प्रकाश धाडीवाल, जीतो अपैस व्हाईस चेअरमन विजय भंडारी, जीतो पुणे चेअरमन राजेंद्र साखला, पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आदी उपस्थित होते. महाराष्ट्र जैन वार्ताचे अभिजित डुंगरवाल, संकेत डुंगरवाल यानीं उपस्थितितांचे स्वागत व कार्यक्रमाचे नियोजन केले. मनोज छाजेड म्हणाले, सिद्धी ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय करताना मूल्यं जपली आहेत. याशिवाय सामाजिक, धार्मिक क्षेत्रातही योगदान देऊन बांधिलकी जपली आहे. नगरमध्ये बुरुडगाव रोडवर भव्य असा स्कायब्रिज गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र जैन वार्ताचा हा पुरस्कार आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
COMMENTS