नागपुर। नगर सह्याद्री - नागपुरात नायलॉन मांजामुळे एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्...
नागपुर। नगर सह्याद्री -
नागपुरात नायलॉन मांजामुळे एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली आहे.
वेद साहू असं मृत मुलाचे नाव आहे. वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. रस्त्यात अचानक मांजा आला आणि त्याचा गळा कापला गेला. दरम्यान त्याला उपचार मिळायला देखील उशीर झाला आहे. अखेर मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळीच त्याचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS