मुंबई । नगर सह्याद्री - पुण्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. हे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. कसब...
मुंबई । नगर सह्याद्री -
पुण्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. हे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. कसबापेठ आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. दोन्ही मतदारसंघात २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बारावी परीक्षा आणि पदवीची परीक्षा असल्यामुळे पुणे पोटनिवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
COMMENTS